कुणालातरी मनापासुन
प्रेम करुन बघितलं,
कुणालातरी माझ्या
आयुष्यात स्थान देऊन बघितलं..
कुणालातरी माझं
संपुर्ण जीवन समजून बघितलं,
कुणालातरी मला आपलं
म्हणताना परखं करताना बघितलं..
कुणालातरी माझ्याशिवाय
जगताना बघितलं,
कुणालातरी प्रेमात टाईमपास
करताना बघितलं..
कुणालातरी मला खोटी खोटी वचने
देताना बघितलं,
कुणालातरी माझं आयुष्य बरबाद
करताना बघितलं..
कुणालातरी माझ्या बरबादीवर मनसोक्त
हसताना बघितलं,
कुणालातरी दुस-याच्या
आयुष्याशी खेळताना बघितलं..
कुणालातरी माझी होता होता
दुस-याची होताना बघितलं,
आणि मी शेवटी...!
जिँवतपणी मरण
काय असते हे अनुभवतानी बघितलं..
जिँवतपणी मरण काय
असते हे अनुभवतानी बघितलं..