पुणे स्पेशल..!
डॉ.जोशी यांची नियमावली:
😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील.
😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच नाव बदनाम करतात.
😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डाॅक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही.
😃 पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही.
😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या.
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
😃 एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार यायला येथे आम्ही पंगत बसविलेली नाही. तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगु नये. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. पुर्ण घरादाराला एकाच शुल्कात म्युन्सिपालटीच्या दवाखान्यात पण तपासत नाहित.
😃 इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी आढेवेढे घेण्याची ही जागा नाही.
😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणुन त्या घेऊ का म्हणुन डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये.
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
😃 कन्सलटंट कडुन तपासुन आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवुन त्याचे डोके खाऊ नये. (सगळ्याच देवाचं करू, ज्याचा गुण येईल तो येईल; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)
😃 डाॅक्टरला बायको-मुलं आहेत, त्यानाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्ही घेणंदेणं न ठेवलेलंच बरं. (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)
😃 कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये.
(इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा)
(इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा)
😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डाॅक्टर दुकानदार बनेल.
तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!
तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!
- (ट्रिटमेंट पुरतेच) आपले डॉक्टर.