Thursday, May 30, 2013

Ushakal Hota Hota - उषःकाल होता होता

ong - Ushakal Hota Hota
Movie - Sinhasan
Lyrics - Suresh Bhat
Music - Pt. Hridaynath Mangeshkar
Singer - Asha Bhosle
Actor - Nilu Phule
गीत - उषःकाल होता होता
चित्रपट - सिंहासन 
गीतकार - सुरेश भट 
संगीत - पं. ह्रदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले
कलाकार - निळु फुले

गीत - उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
Worlds Largest Collections of Marathi Songs ,
Just Subscribe it for latest original marathi songs