असा कसा बिझी असतोस रे तू ???
केव्हा पण फोन करावा तर बिझी आहे असे का सांगतोस तू ??
ऑफिस मधील कामाच्या नावावर का बर मला टाळतोस तु ??
मी पाठवलेल्या मोबाईल मेसेज ला का उत्तर देत नाही तु ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???
फेसबुक वर मी ओन्लाइन दिसली कि ऑफलाईन का जातोस तू ??
वेड्या, तुझ्यावर किती प्रेम करते हि वेडी असे कसे समजत नाहीस तू ??
तुझा आवाज ऐकायला किती तडपत असते याची कल्पना का बर करत नाहीस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???
तुला फोन केल्यावर वेटिंग काल दाखवल्यावर का बर काल ब्याक करत नाहीस तू ??
मला असा तडपवून कुठला असुरी आनंद उपभोगत असतोस तू ??
तुला भेटायचे म्हंटल्यावर " भेटू भेटू " चा पाढा ऐकवून का बर माझा अंत पाहतोस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???
रात्री माझ्या स्वप्नात येवून का बर लवकर पळून जातोस तू ??
टाटा, अंबानी चा असला कोणता नातलग आहेस रे तू ??
रुक्ष वाळ्वंत मधील मृगजलाप्रमाणे का बर मला मागे मागे धावायला भाग पाडतोस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???