ती : "मस्त ना..?
पाउस म्हणजे थंड वारा..."
.
तो : "नाही गं
पाउस म्हणजे चिखल सारा..."
.
ती : "गप रे......
पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..."
.
तो : "अगं
पाउस म्हणजे....., ट्रेनचे वांदे आणि
ऑटो रिक्षाचं भाडं...."
.
ती : "सुधारणार नाहीस तू
पाउस म्हणजे वेडी सर....."
,
तो : "हा हा...
पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची
भर...."
ती : "पाउस म्हणजे भिजलेल्या मातीचा गंध..."
.
तो : "हा हा मातीचा गंध,
पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे, पण
Office नाही
बंद.."
.
शेवटी ती :-"किती Bore आहेस रे तू...?
जा मला नाही बोलायचं
तुझ्याशी...
.
"हे ऐकून त्याने
तिच्या कानात काहीतरी सांगितले,
ती
गालातल्या गालात सुंदर लाजली
अन
त्याला बिलगली.
.
,
,
,
,
,
,
,
तो म्हणालेला : "हे बघ, तुझ्यासाठी
पाउस म्हणजे
जे असेल ते असेल,
पण माझ्यासाठी
.
.
.
.
.
"तुच माझी सर, अन् तूच माझा पाउस,
फक्त मला
कधी हि सोडून नको जाउस......."