Tuesday, February 11, 2014

कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? Valentine Day Special Marathi kavita

माझ्याकडे वेळ नाही, ना तीच्या कडे टाईम
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?

बोलायला जावं म्हटलं तर व्याकरणात अडतयं घोडं
आम्हाला तीचं इंग्लिश बाउन्सर,
तीला मराठी कोडंपत्र लिहायला घेतलं
तर साली सुचत नाही लाइन
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?

विचार केला करायचं का
"कयामत तक" आमिरसारखं.?
त्याला निदान जुही मिळाली,
आम्हाला घर ही व्हायचं परकं !
आमच्या स्टोरीत नुसतेच व्हिलन
कुठाय "हिरॉइन"?
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?

आमच्यापेक्षा देवदास
कीतीतरी जास्त होता सुखी
पारो नाहि तरी
निदान मिळाली असती 'चंद्रमुखी'
आमच्या नशिबात फ़क्त आंबट द्राक्ष,
कधी मिळणार वाईन..?
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?

सरते शेवटी कंटाळून घातलं
विघ्नह्र्त्याला साकडं
म्हणाला तुलाच नाचता येईना
अंगंण कुठं वाकडं...??
"सध्या शेड्युल्ड बिझी आहे,
पुढ्च्या वर्षी पाहीन"
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?

आता कळतंय हा प्रेमाचा
सगळा खोटा थाटखरं
प्रेम स्वत्ताहुनच शोधत येईल वाट
कुणीतरी कधीतरी नक्की होईल
आपल्याला जॉईन
सगळेच दिवस मग प्रेमाचे,