Thursday, April 3, 2014

आय लव्ह यू! Marathi Jokes


गंपू: (पिंकीला) आय लव्ह यू!

पिंकी त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, काय रे, काय बोललास? 

गंपू: ऐकूच नाही आलं, तर कानाखाली कशाला मारलीस?

--------------------------------------------------------------
रस्त्यात राघू आणि मैनेचं भांडण सुरू असतं. राघू जोरजोराने ओरडत असतो, तू, मला फसवलं आहेस. आपण रजिस्टर लग्न करायचं ठरवलं होतं ना.. 

मी दिवसभर पोस्ट ऑफिसमध्ये तुझी वाट बघत बसलो होतो, पण तू आली नाहीस! '
--------------------------------------------------------------
झोंबाडे मास्तरांना एकदा झंप्याचे इंग्लिश तपासायची लहर आली. 

झोंबाडे मास्तर : झंप्या , ' अंथरुण पाहून हातपाय पसरावे याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू. 

झंप्याने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले , ' स्प्रेड युवर तंगडी इन अव्हेलेबल घोंगडी '. 

--------------------------------------------------------------
अमेरिकेत एका बीचवर गोपालसिंग पहुडलेला असतो. 
तिथे एक अमेरिकन येऊन त्याल विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?' 
गोपालः नाही ... आय अॅम गोपाल सिंग ... 
थोड्या वेळाने दुसरा अमेरिकन येऊन तेच विचारतो , ' आर यु रिलॅक्सिंग ?' 
शेवटी गोपाल वैतागतो आणि उठून निघून जातो. तेवढ्यात त्याला एक अमेरिकन जवळच पहुडलेला दिसतो. 
गोपालः आर यु रिलॅक्सिंग 
अमेरिकनः येस ... 
गोपालः मग जा सगळे तुलाच शोधताहेत! 
--------------------------------------------------------------