Thursday, January 29, 2015

नाहीतर मत मिळणार नाही.


उत्तर प्रदेशात थंडीची लाट असतानाच विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. रस्त्यावर कुडकुडत असलेल्या एका आजीबाईला डोक्यावर चादरींचा गठ्ठा घेऊन जाणारा एक माणूस दिसला. मतदारांना चादरी वाटण्यासाठी चाललेला एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल असे वाटून आजीबाईंनी त्याला हाक मारली. त्यावर माणूस उद्गारला, अहो, या चादरी हत्तीचे पुतळे झाकण्यासाठी आहेत. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------

पुणेरी मतदाराच्या दारावरची पाटी- 

मतदार दुपारी झोपेत असतात. कृपया बेल वाजवू नये. नाहीतर मत मिळणार नाही. 

आमचे मत तुम्हालाच आहे, याची खात्री बाळगा!!)