गणपुले बाईंनी कार घेतली. एकदा त्या ड्राइव्ह करत फिरायला निघाल्या. एका चौकात सिग्नल न पाहताच त्यांनी गाडी पुढे नेली. पोलिसांनी शिट्टी वाजवूनही त्या थांबल्या नाहीत. पोलिसाने गाडीचा नंबर टिपून घेऊन कोर्टात त्यांच्यावर खटला भरला.
न्यायाधीश : काय हो, तुम्ही सिग्नल का तोडलात? या पोलिसाने कितीतरी वेळा शिटी वाजवूनही तुम्ही थांबला नाहीत, हे खरं आहे का?
गणपुले बाई : इश्श्य, आता हे काय माझं वय आहे का शिट्या ऐकण्याचं?
----------------------------------------------------------------------------------------------------
गंपू गर्लफ्रेण्डला व्हॅलेंटाइन गिफ्ट म्हणून अंगठी घेतो.
सेल्सगर्ल : तुमच्या गर्लफ्रेण्डचं नाव कोरू का यावर?
गंपू : नाव नको, त्यावर लिही- फक्त तुझ्याचसाठी!
सेल्सगर्ल : वा किती रोमँटिक!
गंपू : रोमँटिक काय त्यात? किती प्रॅक्टिकल म्हणा हवं तर... गर्लफ्रेण्ड बदलली तरी अंगठी कामी येईल ना!