Thursday, March 20, 2014

स्वप्नांचा अर्थ-Marathi jokes

मॅडम - पेपर खूपच सोप्पा आहे... लवकर लवकर उत्तरे लिहा... 

गंप्या - मॅडम तुमचं बरंय. तुम्हाला आधीच उत्तरं माहिती आहेत.



------------------------------------------------------------------------------
पतीला फोनवर) तुम्ही मला गिफ्ट घेऊन येत असल्याचे स्वप्नात पाहिले, याचा काय अर्थ होतो?
पती : तुला संध्याकाळी कळेल.
पती जेव्हा संध्याकाळी ऑफिसहून घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक पाकीट होते. पत्नीने आनंदाने ते उघडून पाहिले, तर त्यात एक पुस्तक होते.
पुस्तकाचे नाव होते... 'स्वप्नांचा अर्थ'


--------------------------------------------------------------------------
ब्रिटीश माणूस भारतीय आजीबाईंना विचारतो, ब्रिटीश माणूस - व्हॉट इज युअर नेम? आजीबाई - वय झालं रे बाबा, आता माझा काहीच नेम नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------
गंपू: अरे, कळलं का, फेसबुकने व्हॉट्सअॅप १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतलं...

झंपू: काय सांगतो? हा झुकेरबर्ग पण ना! त्यापेक्षा फ्री डाऊनलोड करायचं ना!


----------------------------------------------------------------------------------------------
रात्री खूप पाऊस पडत असतो. वादळ होत असतं. तेवढ्यात गंपूच्या घराची बेल वाजते. गंपू दार उघडतो.

भिजत कुडकुडत उभा असलेला एक माणूस गंपूला म्हणतो, 'धक्का द्या ना, प्लीज!' रात्री उठवल्याने वैतागलेला गंपू 'नाही' म्हणून दार बंद करतो. नंतर त्याला पश्चात्ताप होतो, म्हणून तो पुन्हा दार उघडून त्या माणसाला आवाज देतो, 'अहो, कुठे आहात?'

अंधारातून आवाज येतो, 'इकडे.. बागेत झोपाळ्यावर!!'