निवडणुकीत नव्याने निवडून आलेले गणपतराव, ग्रामीण जीवन आपल्याला कसं आवडतं हे दाखवण्यासाठी बैलगाडीच्या बाजूला उभे राहिले. बैलाच्या अंगावर हात ठेवून मस्त पोज देत त्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतला. दुस - या दिवशी तो फोटो पेपरमध्ये छापून आला. फोटोखाली कॅप्शन होती
------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : अहो दुकानदार, ही रिसिट बघा. पाच वर्षांपूवीर् मी माझे फाटलेले बूट तुमच्याकडे शिवायला
दिले होते. मी ते विसरूनच गेलो होतो.
दुकानदार : नो प्रॉब्लेम. मी शोधून काढतो.
थोड्या वेळाने दुकानदार धुळीने माखलेला एक बॉक्स घेऊन येतो.
गंपू : अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीय की तुम्ही एवढ्या आठवणीने माझे बूट ठेवले
असतील.
दुकानदार : इट्स ओके. ग्राहकांचं समाधान हेच तर आमचं उद्दीष्ट आहे. असो, आता ८ दिवसांनी बूट
न्यायला या. अजून त्याची शिलाई बाकी आहे.


