Wednesday, November 27, 2013

टी व्ही

टी व्ही समोर बसून
उगाच चँनेल चाळत होतो...

बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे ?


मी म्हणालो भरपूर धूळ!

.........आणि भांडण जोरात सुरु झालं .

लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?

विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"

मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...

"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली

मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !

......... आणि भांडण जोरात सुरु झालं .

आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
"काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "

मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."

......... आणि भांडण जोरात सुरु झालं.

मी विचारलं -
"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"

ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"

मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..