Tuesday, June 18, 2013

नजरेची भाषा कळली

नजरेची भाषा कळली

कि मन कळायला लागत
अबोल राहिले ओठ
तरी हृदय
समजायला लागत
जाणीवा साऱ्या मनीच्या
डोळ्यात दिसायला लागतात
भावना त्या प्रीतीच्या
काळजाला कळायला लागतात
हृदयात प्रेम उमललय
हृदयाला बरोब्बर कळत
माझं तुझ्यावर प्रेम आहे
न सांगताही कळत
प्रेमाची सुरवात नेहमी
अबोल कशी असते
कळत नाही प्रियेच्या
प्रीत नजरेत कशी दिसते
फक्त ती नजर
वाचता यायला हवी
जी प्रीत आपली आहे
ती ओळखता यायला हवी ...