Sunday, May 12, 2013

एक सुंदर परी...

शाळा चित्रपट पाहिला, एक न विसरण्या जोगी गोष्ट म्हणजे शिरोडकर aka केतकी माटेगावकर.
या चित्रपटात ती ज्या प्रकारे वावरलीय, तिचा तो सहज सुंदर अभिनय, तीच ते लाजणे , केसात फुल माळणे, फक्थ डोळ्यांनी इशारे करणे (बुद्धिबळ खेळताना) , तिचा तो गोड आवाज (No doubt, मी तिला कुठे तरी पाहिल्याचे राहून राहून वाटत होते पण आठवत नव्हते आणि तिने शब्द उच्चारताच डोक्यात लक्ख प्रकाश पडला " सा रे ग म प " ) , आणि सर्वात महत्वाची चेह ऱ्यावरची निरागसता , सार सार मनात भरून राहिलय, तिचे ते बोलके डोळे आणि 
गालातल्या गालात हसणे या दोनच गोष्टी जरी तिने पूर्ण चित्रपटात केल्या असत्या तरी चालले असते 
असे वाटते (तिचा अभिनय इतका सुंदर होता की त्यासाठी कुठल्याही DIALOG ची गरज नव्हती सारे काही तिच्या डोळ्यातून आणि हसण्यातून प्रेक्षकांच्या (माझ्या) थेट हृदयापर्यंत पोहचत होते :-) )

मोती कलर च्या फ्रॉक मध्ये , गुढ्या पर्यंत रुळणाऱ्या केसांमध्ये ती एका परी सारखीच भासली
त्या परी साठीच... 




एक सुंदर परी...





स्वप्नात आली एक सुंदर परी 
सांगत होती ती मला काहीतरी...


राहून राहून वाटत होते, पाहिलेय तिला कुठेतरी 
मी तर फिदा झालो तिच्या दिसन्यावरी... 


रेखीव भुवया, गालावरच्या खळ्या 
तिच्या मुळे उमलल्या हिरमुसलेल्या कळ्या...


पाणीदार डोळे, चेह्र्यावरचा तीळ 
त्यातात गुंतला हा वेडा जीव...




हाथ धरून ती माझा, घेऊन गेली स्वप्नांचा देशा
स्वप्नवतच होते सारे , प्रसन्न आणि आल्हाददायक...


जुन्या आठवणी झाल्या ताज्या,मीही राहिलो नाही माझा
स्वतःला शोधण्यात येत होती एक वेगळीच मजा...


कोवळे वय , अल्लड भाषा स्वप्नवतच होते लेका
निरागस, निष्पाप प्रेमाची अनुभूती, त्याच वेळी त्याच देशा...

माणसांमध्ये माणुसकी , दुसर्याला मदत करण्याची प्रवृत्ती 
खेळ, अभ्यास आणि मजा या शिवाय नव्हती कसलीच युक्ती...

एकेक क्षण मी पुन्हा अनुभवत होतो जगत होतो
या कलयुगाला हळूहळू विसरत होतो...

त्यातच जाग आली, पुन्हा स्वप्न शोधू लागलो
पण सारे व्यर्थच, परीही नव्हती आणि तो देशही...

मी तर होतो याच जगात
लोळत पडलेलो एका दुर्मिळ स्वप्नात...

मनात उगीचच विचार तरळला

स्वप्न मिळवीत प्रत्यक्षात उतरवायला...