Showing posts with label Kavita. Show all posts
Showing posts with label Kavita. Show all posts

Wednesday, March 12, 2014





आज पुन्हा नव्या जोमाने,


प्रेमाची बाजी मी खेळणार आहे.....


तुला माझ्यासाठी जिँकताना पाहून,


स्वतःच पराभव मी पत्कारणार आहे.....


माझ्या अधु-या राहीलेल्या स्वप्नांना,


तुझ्या साथीने मी खरी ठरवणार आहे.....


तुला प्रेम जाळ्यात फसवून,


माझ्यात पुर्णपणे मी गूंतवणार आहे.....


आणि.....!!!


Love नावाचा Timepass,


तुझ्यासोबत LifeTime मी करणार आहे.....
[♥] [♥] [♥]


_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)


स्वलिखित -
दिनांक १६-०२-२०१४...
सांयकाळी ०८,५२...
©सुरेश सोनावणे.....

Monday, November 11, 2013

आयुष्य कसं असतं?
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा

Sunday, November 3, 2013

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,

त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली....
माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन.
पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली...
प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली...
अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन...
पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता...
मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय...
व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले 'Connected',
पण शेजारधर्म 'Was Totally Disconnected'...
आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
'देव देव' काय करता,पूजा करायचं पण App आलाय
आता....
या 'Technology' मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता....
विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या 'Technology' ची...

Friday, November 1, 2013

"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल.
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल.
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास.

पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास.
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल
काही नाही.
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही.

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका.
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता.
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे.
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे.
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही.

"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

Saturday, October 19, 2013

तूच सांग या वेड्या मनाला

पापण्यांचे पंख लावून आज

उडू पहातंय पाखरू ,
तूच सांग ,या वेड्या मनाला ,
आता कसं आवरू?

खूप समजावलं त्याला ,
अरे,क्षितीज असतं फसवं ,
गवसल्यासारख वाटतं ,तिथेच,
शोध होतो पुन्हा सुरु ........

इंद्रधनुचे सप्तरंग ,
आपल्यासाठी नसतात रे ,
सगळ हरपून बघ ,पण ,
त्याची आस मात्र नको धरू ........

आकाशीचे चंद्र -तारे ,
फक्त अंधाराचेच सोबती ,
त्या आभासाच्या मागे तू ,
नको रे गरगर फिरू.......

रहाता राहिला सूर्य ,अरे,
तो तर आपला कधीच नसतो ,
जवळ त्याच्या जाण्याचा तर ,
विचारसुद्धा नको करू..... ...

एकूण काय ,आभाळ नसतं आपल्यासाठी ......
आपली स्वप्न जमिनीवरची ,
उडण्याच्या या हट्टापायी
त्यांनाच नको विसरू............

मग ते म्हणालं ,
एकदाच मला उडू दे......
पंखांची ताकद आजमावूदे ,
वाळूतली मृगजळसुद्धा ,
उडता -उडता पाहूदे....

फार तर काय होईल ?
पापण्यांचे पंख अश्रूंनी भिजतील .....
पण माझा प्रयत्न सच्चा होता ,
याचं समाधान तरी राहील ........

शेवटी मग मीही म्हटलं ,उडू दे बापड ,
आज त्याचाही हट्ट पुरा करू ,
सरळ बळ पंखातलं तर ................
आपणच एकमेकांना सावरू ................................

- माधुरी .......
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना... रोजचाच चंद्र नभी तो,

वाटे आज मज का आज नवा,
ओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..

नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

वेग-वेगळ्या प्रवासाचे प्रवाशी आपण,
वाटा जुन्या जरी,भेट आपुली नव्या वळणावर,

सवे सोबती तुझ्या....रस्ता जुनाही वाटे आज का नवा-नवा,
नवी-नवी मैत्री आपुली,

नव्या आपल्या भावना...
भेट जरी नवी आपुली,

ओळख न जाणे कोण जन्मांची,
अंतर आपल्यातली विस्कटू लागली...ओढ लावे आता जीवा....

नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

अजाण,हळवे,नाते आपले..
अवचित जुळावे कैसे कोण ठाव,

मैत्रीचे सुंदर आपुले नाव नसलेले एकच गाव,
त्यात दोघेच आपण आणि रोज पाहु एक दिवस नवा...

नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली

पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली

अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या

पेनातली शाई संपली ...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले ....वर्षामागुन वर्ष गेली ...
माझी प्रत्येक रात्र ..त्याच स्वप्नात रंगून गेली ..

मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...

आता जगायला मी शिकलो आहे ....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्या आहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही ..

Thursday, October 17, 2013

असा कसा बिझी असतोस रे तू ???

केव्हा पण फोन करावा तर बिझी आहे असे का सांगतोस तू ??
ऑफिस मधील कामाच्या नावावर का बर मला टाळतोस तु ??
मी पाठवलेल्या मोबाईल मेसेज ला का उत्तर देत नाही तु ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???

फेसबुक वर मी ओन्लाइन दिसली कि ऑफलाईन का जातोस तू ??
वेड्या, तुझ्यावर किती प्रेम करते हि वेडी असे कसे समजत नाहीस तू ??
तुझा आवाज ऐकायला किती तडपत असते याची कल्पना का बर करत नाहीस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???

तुला फोन केल्यावर वेटिंग काल दाखवल्यावर का बर काल ब्याक करत नाहीस तू ??
मला असा तडपवून कुठला असुरी आनंद उपभोगत असतोस तू ??
तुला भेटायचे म्हंटल्यावर " भेटू भेटू " चा पाढा ऐकवून का बर माझा अंत पाहतोस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???

रात्री माझ्या स्वप्नात येवून का बर लवकर पळून जातोस तू ??
टाटा, अंबानी चा असला कोणता नातलग आहेस रे तू ??
रुक्ष वाळ्वंत मधील मृगजलाप्रमाणे का बर मला मागे मागे धावायला भाग पाडतोस तू ??
असा कसा बिझी असतोस रे तू ???
मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
………………………………पैसे परत देत नाही
मित्रानि पिताना दिलेला शब्द
लक्षात कधी ठेवायचा नसतो
कारण आठवणं करून दिली तरी तो
……………………………… विश्वास काही ठेवत नाही
मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन
डीसकनेक्ट करायचा नसतो
कारण डीसकनेक्ट केला तरी तो
……………………………… घरी येणं टळत नाही
मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो
……………………………… गाडी परत देतच नाही
मित्राला काही झाल तरी
गर्ल फ्रेंड चा नंबर देता येत नाही
कारण काही झालं तरी तो
………………………………तिला फोन केल्या शिवाय
रहात नाही
मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो
………………………………एकटआपल्याला सोडत नाही
मित्र नको असला तरी त्याला
सोडून पुढे जाता येत नाही
कारण जर हरवला तर तो
………………………………आयुष्यात पुन्हा मिळत
नाही..
 —