Showing posts with label Marathi Movies Songs. Show all posts
Showing posts with label Marathi Movies Songs. Show all posts

Tuesday, June 18, 2013


Movie : Asla Navara Nako Ga Bai (1977)
Lyrics : Jagdish Khebudkar
Music : Ram Kadam
Singer : Anuradha Paudwal, Jaywant Kulkarni
Actors : Ranjana, Raja Gosavi

चित्रपट-असला नवरा नको ग बाई (१९७७)
गीत-जगदीश खेबुडकर
संगीत-राम कदम
स्वर-अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी
कलाकार - रंजना, राजा गोसावी

बोल - ही कशानं धुंदी आली
काही समजं ना, काही उमजं ना 
ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली

किरणांचा पसारा फुलतो रं
जीव अंतराळी या झुलतो ग
मन हुरहुरलं, का बावरलं, ही कशाची जादू झाली

ही कुजबुज कुजबुज कसली
ही पानं खुदुखुदु हसली
लाडीगोडी बघुन, छेडाछेडी करून, चांद लबाड हसतो गाली

लई टिपूर टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी 
दोनी डोळं मिटून, आज आली कुठुन, मला गुलाबी कोडं घाली

Youtube Chennal
Worlds Largest Collections of Marathi Songs ,
Just Subscribe it for latest original marathi songs

Wednesday, June 12, 2013



Song - Sakhya Re Ghayal Mee Harini
Movie - Samna (1975)
Lyrics - Jagdish Khebudkar
Music - Bhaskar Chandavarkar
Singer - Lata Mangeshkar
Actors - Nilu Phule 

चित्रपट - सामना (१९७५)
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - लता मंगेशकर
राग - सोहनी (नादवेध)
कलाकार - निळु फुले

गीत - अंधार रातीचा कुठं दिसना वाट
कुण्या दवाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरीणी

काजळ काळी गर्द रात अन कंपकंप अंगात
सळसळणार्‍या पानांना, ही रातकिडयांची साथ
कुठे लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावूनी

गुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी कशी पळू मी गेले मी हरवूनी

Email Subscription http://feedburner.google.com/fb/a/mai... 
Worlds Largest Collections of Marathi Songs ,
Just Subscribe it for latest original marathi songs

Thursday, May 30, 2013

ong - Ushakal Hota Hota
Movie - Sinhasan
Lyrics - Suresh Bhat
Music - Pt. Hridaynath Mangeshkar
Singer - Asha Bhosle
Actor - Nilu Phule
गीत - उषःकाल होता होता
चित्रपट - सिंहासन 
गीतकार - सुरेश भट 
संगीत - पं. ह्रदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले
कलाकार - निळु फुले

गीत - उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
Worlds Largest Collections of Marathi Songs ,
Just Subscribe it for latest original marathi songs


Tuesday, April 23, 2013



माझे मन तूझे झाले

तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाश ी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥
माझे मन...


Saturday, February 9, 2013


Wednesday, February 6, 2013


Choricha Mamla (1976)
CastCrewArtistName
CastLalita Pawar
DirectorBabasaheb S. Fattelal
Music DirectorRamkadam
LyricsJagdish Khebudkar
Playback SingerUsha Mangeshkar

sa