Showing posts with label मराठी म्हणी. Show all posts
Showing posts with label मराठी म्हणी. Show all posts

Thursday, July 16, 2015


वेळ काडून नक्की वाचा 
👇
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली 
तर तिला काहीही बोलु नका

जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही

जेव्हा मागत होते चॉकलेट 
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही

आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही

जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही

जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही

जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... 
जे तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण करतात... *

Monday, July 13, 2015


विवाह 2025...
पंडित :- सर्व वऱ्हाडी मंडळी group Online आले का?
नवऱ्याला Online बोलवा.
आता नवरीला Online बोलवा.
(Online आल्यावर )
पंडित :- तुम्ही दोघे तुमचं रिलेशन स्टेटस सिंगलवरून
म्यारीड असे बदलायला तयार आहात का ?
नवरा,नवरी :- हो !!.. ..
पंडित : चला Group members एकदम Flower smiley टाका.
विवाह संपन्न....
आता दक्षिणा, Iphone 6 n 5 महिन्यांचा Recharge.

Sunday, July 12, 2015



रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता...
.
.
.
.
त्या वेळी भगवान श्रीरामा ने
लक्ष्मणाला सांगीतले की
या विश्वातून नीति, राजनीति आणि
शक्ति चा महान् पंडित सोडून चालला आहे, तु
त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या
शिवाय दुसरा कोणी देवू शकणार नाही...
.
.
.
.
श्रीरामाची आज्ञा मानुन लक्ष्मण
मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्या
जवळ जावून ऊभा राहीला...
.
.
.
.
रावणा एक शब्द ही बोलला नाही...
.
.
.
.
लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आले...
.
.
.
.
तेंव्हा भगवान राम म्हणाले कोणा कडुन
ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या
पाया जवळ ऊभे रहावे डोक्या जवळ नाही
.
.
.
.
भगवान रामाचे म्हणने ऐकून
लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ
जावून ऊभा रहीला
.
.
.
.
त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला
तीन महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या
ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत...
.
.
.
.
1. Whatsapp पासुन दुर रहा...
2. Facebook चा उपयोग करु नका...
3. गाड़ी चालवताना मुलींकडे बघू नका
नाही तर माझ्या पेक्षा वाईट हाल
होतील
लक्षपुर्वक वाचल्या बद्दल धन्यवाद्....

Saturday, July 11, 2015


पुणे स्पेशल..!
डॉ.जोशी यांची नियमावली:
😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील.
😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच नाव बदनाम करतात.
😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डाॅक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही.
😃 पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही.
😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या.
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
😃 एका पेशंट सोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे. इष्टमित्र सहपरिवार यायला येथे आम्ही पंगत बसविलेली नाही. तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगु नये. आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल. पुर्ण घरादाराला एकाच शुल्कात म्युन्सिपालटीच्या दवाखान्यात पण तपासत नाहित.
😃 इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी आढेवेढे घेण्याची ही जागा नाही.
😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणुन त्या घेऊ का म्हणुन डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये.
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
😃 कन्सलटंट कडुन तपासुन आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवुन त्याचे डोके खाऊ नये. (सगळ्याच देवाचं करू, ज्याचा गुण येईल तो येईल; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)
😃 डाॅक्टरला बायको-मुलं आहेत, त्यानाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुम्ही घेणंदेणं न ठेवलेलंच बरं. (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)
😃 कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये.
(इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्सनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा)
😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डाॅक्टर दुकानदार बनेल.
तुम्ही आधी 'माणूस' बना, मग डाॅक्टर अवश्य 'देवमाणूस' बनतील..!
- (ट्रिटमेंट पुरतेच) आपले डॉक्टर.

Friday, July 10, 2015


एकदा एक साधु बाबा दारू दुकानात गेले.
तिथे जाताच तिथं असलेले बेवङे लोकं त्यला पाहुन हसायला लागले.
त्यांना हसताना बघुन बाबा त्यांना म्हणला !
बाबा : बघा पोरांनो ! हसु नका, बाबावर हसणे खुप महाग पडेल !
ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात हसायला लागले !
आणि
हसता हसता त्यांच्या ङोळ्यापुढे अचानक अंधार झाला!
सगळ्यांना आपली चुक समजली !
सगळ्यांनी बाबांचे पाय धरले
आणी माफी मागायला लागले !
"बाबा आम्हाला काहिच दिसत नाहिये
आम्हाला माफ करा, आमची चुक झाली, आम्हाला माफ करा"
.
.
.
.
बाबानी शांतपणे पायातला बुट काढला आणि एका-एकाच्या पाठीवर
हाणायला सुरुवात केली !
आणि जोरात बोलले !
.
.
.
.
.
.
.
बाबा : पाय सोडा रे हरामखोरांनो !
लाईट गेलीये ! मलापण काहि दिसत नाहिये
महावितरणची जादू तिथे काय करेल साधु

Wednesday, July 8, 2015


प्रेम तर तिच्यावर पाचवीतच झालं
होतं..
.
जेव्हा तिने_बेंचवर_मागे_वळुन
विचारल की,
.
काल_का_नव्हता_आलास_रे ..

.
.

जुन्या_आठवणी ..

Saturday, October 19, 2013

एक ना code, भाराभर bugs
· code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये
· मरावे परी bugs रूपी उरावे
· आपलाच code आणि आपलेच bugs
· आपला तो program, दुसऱ्याचं ते copy-paste

· इकडे code तिकडे release
· project आला होता, पण deadline आली नव्हती

· Engineer ची खोड lay-off शिवाय जात नाही

· अतीशहाणा त्याचा code रिकामा
· Developer मागतो ’A’ rating, Manager देतो ’D’
· code कळला तरी bugs मिळत नाहीत
· bonus नको पण workload आवर
· स्वतः coding केल्याशिवाय output दिसत नाही
· दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वतःच्या कोडातले errors दिसत नाहीत
· दिसतं तस नसतं म्हणूनच client फसतं

Monday, January 28, 2013



1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!!

2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!

3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा !!!!!

4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!

5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!!!

6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!

7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!!!!

8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!

10) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!

11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!

12) जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

13) उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!

14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!

15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!!