Thursday, May 2, 2013

ट्यूशन

बॉसने सेक्रेटरीला फोन केला , ''
एका आठवड्यासाठी आपण
बाहेरगावी चाललो आहोत .
त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''

सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''
एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे
बॉसबरोबर .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , ''
एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जा
आहे . तू माझ्या घरीच राहायला ये .''
...
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट
ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , ''
मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे .
तुला ट्यूशनला सुट्टी .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' बाबा ,
माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे .
मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला .''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला , ''
हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार
आहे . बाहेरगावी जाणे रद्द .''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''
बाहेरगावी जाणे रद्द .''
नव-याने प्रेयसीला फोन केला , '' आपली भेट
रद्द .''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , '' माझे जाणे
कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन सुरूच राहील .''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , '' ट्यूशन सुरूच
राहणार आहे . आपलं जाणं रद्द .''