Thursday, June 20, 2013

सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातातहात
तुझा,अंगभर
शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात
कुणाच्या...क्षणभर
शहारून
सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
सोबत
पाहिलेला तुटताना तारा,काहीतरी मागु
उजळून आलेला चेहरा तुझा,जेव्हा तुटेल हे
मन कुशीत
कुणाच्या
सांग आठवशील ना मला ?
सांग आठवतोय ना तुला ?
अवघड वळणावरचा वेडा बहाणा,तू
नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास
तुझा,जेव्हा भासेल
उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
सांग आठवशील ना मला ?♥♥♥