Sunday, June 16, 2013

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं
उगीच असं घडत नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
तुला स्वप्नात घेतल्याशिवाय
मनही निजू शकत नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
एक क्षणही तुझ्या आठवणीशिवाय
माझा कधीच जात नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
फक्त तूच माझं विश्व झाली आहेस
इतकं वेड मला लागू शकत नाही

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
उगीच माझ्या रोमा रोमात
तुझी प्रीत फुलली नाही .