Thursday, June 6, 2013

परिच्छेद - ७ वसंत पुरुषोत्तम काळे


"मुली पाहणं हा पुरुषांचा स्थायी स्वभावच आहे .मुली,स्त्रिया पाहणं हा त्यांचा धर्म आहे ,हि भावना जोवर जागती आहे तोवर पुरुष हा पुरुष आहे.

आता विनाचे वडील ,तसं वय झालेलं,पण असे या खिडकी जवळ उभे राहिले कि गुंग व्हायचे.मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पहात रहायचे.ते तर पुरुषच;
पण तुला सांगते एक दोनदा मी पण त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिले.रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या पुरुषाच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला.तेव्हा बायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले."

"एकदा आमच्या बायकोला तुम्ही तुमचे हे विचार ऐकवा म्हणजे बरं होईल?"

"नाही,नाही त्याचा उपयोग व्हायचा नाही.तरूनपणात बेटा अहंकार असतो.आपली तुलना इतरांबरोबर होता कामा नये असा वाटतं.त्यात काऽऽहि गैर नाही.माझ्या तरुणपणात माझ्या नवऱ्याला मी काय कमी छळलं ?हे सध्याचे विचार म्हातारपणा मुळे आलेले आहेत.
स्वत:च्या रूपाचा अहंकार जळला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मलाच आता छंद वाटू लागला आहे.चित्रासारख्या राहतात. बेभान करण्याचे तंत्र बरोबर शिकल्या आहेत पोरट्या......"

*गुलमोहर*

प्रत्येक पुरुषाच्या मनात एक सुप्त पुरुष हा असतोच. बायको सोबत असो किंवा नसो, परकी स्त्री ही आपलीच वाटत असते. असा स्त्रीयांचा समज आहे. त्यामुळे बायको नवर्‍यावर संशय घेत असते. यातूनच संसारात मिठाचा खडा पडू शकतो. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात असे वादाचे प्रसंग येतात. आपल्याही आले असतील, असे प्रसंग आपण वाचकांना सांगावेत, स्त्रियांनी पण आपल्या नवर्‍या बद्दलची मते, गैरसमज इथे सांगावेत.
आपले विचार आम्हाला अपेक्षीत आहेत..

धन्यवाद…!
आपले स्नेहांकित
व. पु. काळे पेज संचालक मंडळ.

LIke Us on FB page