Tuesday, July 2, 2013

नाही बांधू शकत ताज महल मी

नाही बांधू शकत ताज महल मी
म्हणुन काय मी शोक करत बसायचे
प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे
ठरविले मी काही तरी लिहायच
घेतला आधार मी शायरीचा
आणि ठरविले मनसोक्त वहायचे
नाही जमल ताज महल तर
यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे..
नाही होऊ शकत नायक मी
म्हणुन काय नालायक व्हायचे
खुप मनापासून केलेल प्रेम
पायाखाली तूडवायचे ...
ठरविले मी नाही आता नाही
तटस्थ आपण रहायचे
थोडून सारी बंधने
प्रेमसागारत डुबायच
-------------------------------------------------------------------------------------------------------

आज ही ती माझ्याशी काहीच
बोलली नाही...
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही
चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही
सगळयान्बरोबर असताना हसून दुःख
लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती
मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले
नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी
नाही
ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत
नव्हती ?