एक मुंबईकर काका नुकतेच पुण्यात राहायला आलेले असतात. दुस-याची टिंगल करण्याच्या आपल्या सवयीप्रमाणे ते धारवाल्याला म्हणतात , ' काय रे , अकलेला पण धार लावून देतोस का ?'
पुणेरी फेरीवाला : हो , देतो की. जरा घेऊन या बरं तुमची अक्कल!
------------------------------------------------------------------------------------------------
एकदा एक नवीन नाटककार नाटक लिहितो , त्याचं दिग्दर्शन करतो आणि ते बऱ्यापैकी चालतं. एकेदिवशी मोठ्या अभिमानाने तो आपल्या आईला पहिलं नाटक दाखवायला घेऊन जातो. त्याची आई ते नाटक पाहते आणि नाटक संपल्यावर आपल्या मुलाला विचारते , ' हेच का ते नाटक ज्यासाठी तुला रोज १०० रुपये मिळतात?'
नाटककार : हो आई.
आई : अरे वा , म्हणजे तुला लोकांना मूर्खात काढण्याची कला चांगलीच जमली की!