Sunday, June 9, 2013

कॉमन माणूस



चाकरमानी म्हणजे मुंबईच्या 
गर्देतलो "कॉमन माणूस "

गावाची नाळ तोडून, 
पोट भरुक येता
नशिबाक दोष देत, 
मुंबईकर होवन जाता

तेका सुद्धा वाटता, 
गावाकडे रवायाचा
सकाळच्या पारार उठान, 
गायीच्या बोम्बांका तोंड लावायचा
झाड्यासाठी लायन न लावता, 
नदीकाठी धावायचा

पिशयेतल्या दुधान तेची, 
तहान मिटान जाता
बाजारातल्या बेसनाक, 
तो पिठी समजान खाता

आपल्या भाषेक गावपण, 
मुंबईत जपाक जाता
ट्रेन मध्ये भजन, 
गावून पोलीसाचो मार खाता

बाल्कनीत तुळशी लावन आणि ,
गावाची उकड्या तांदळाची ,
पेज खावन समाधान मानून घेता
पण इंग्राजलेल्या पोरांसमोर, 
नाईलाज तेचो होता

मालवणी जत्रेक जावन, 
वाडे सागुती खाता
खटखटे लाडू आणि खाजा, 
घेवन घराकडे येता

मालवणी बोलाचा कि मराठी ,
ह्या कन्फ्युजन मध्ये रवता
"मी भांडूप ला रवतो" सारख्या,
मालवणी मिश्रित भाषेत मराठी तो बोलता

गावाकडे जाताना मातुर, 
खूप खुश होता
रोज 2 तास OT मारून, 
नवीन लुंगी बनियन घेता
खावक म्हनान प्रेमान तो, 
"मैसूर पाक" नेता
मेल्या "शिनेला" कसली हाडलस, 
म्हटल्यार तोंडात मारून घेता

गावात्ल्यान्का वाटता मेलो,
खूप कायतरी कमावता

पण पोरांचा शिक्षण, 
आणि बिल्ला भरता भरता
तो पुरा आयुष्य गमावता

गणपतीच्या येलेक मात्र, 
पुन्हा "फिनिक्स " पक्षी होता
गावाकडे जावाचा म्हनान, 
राखेतसून जन्म घेता
असात नसात ता गहान ठेवन, 
गावाकडे पळता

10 बाय 10 च्या खोल्येत हुक्लेलो, 
"रोमान्स" करुक गावातच तर येळ मिळता

अजून सुद्धा न चुकता, 
मनी आर्डर पाठवता
आपण एक वेळ खावन, 
पोरांका खूप शिकवता

आयुष्याचा शेवटी मात्र,
पुन्हा मन व्हावता
शेवटचे दिस मजेत काडुक,
गावाकडे धावता

असो आमचो चाकरमानी, 
नो " मनी " पण मोठेपनाचो "धनी"