Saturday, June 22, 2013

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं



असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर
वाटतं
अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो
मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे
वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे
वाटते
लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून
जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने
वाचुन होतात
Extra lecture ठेवले
तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये
यायची तयारी असते
असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात