Monday, March 17, 2014

वॉट्सअॅप-marathi Jokes

एका ऑफिसमध्ये नव्यानेच जॉइन झालेल्या बॉसने आपल्या केबिनबाहेर एक पोस्टर लावलं. त्यावर लिहिलं होतं, 'इथे फक्त माझी हुकूमत चालते. सर्वांनी त्याप्रमाणे वागलंच पाहिजे.' दुसऱ्या दिवशी त्या पोस्टरच्या बाजूला दुसरं पोस्टर लावण्यात आलं होतं... 'सर, तुमच्या बायकोचा फोन आला होता. बाजूला लावलेलं पोस्टर घरचं आहे, ते परत घेऊन या असा निरोप त्यांनी दिला आहे.'

---------------------------------------------------------------------------------------------

नवरा-बायको जेवायला बसलेले असतात. 

नवरा - आज भाजीत मीठ जरा जास्त झालंय. 

बायको - मीठ बरोबर आहे, भाजी थोडी कमी पडलीय. 

--- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- 

गर्लफ्रेंड - (सीए असलेल्या बॉयफ्रेंडला) हे, या वीकेंडला काय प्लॅन्स आहेत? 

बॉयफ्रेंड - इन्कम टॅक्स रिटर्न्स 

गर्लफ्रेंड - अरे, पण या मूव्हीचा पहिला भाग कधी आला होता? 

--- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- 

पेशंट घाईघाईत डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरला...

डॉक्टर - काय हो, तुमचे पुढचे तीन दात कसे तुटले?

पेशंट - काय सांगू, माझ्या बायकोने इतक्या कडक चपात्या बनवल्या होत्या की विचारु नका.

डॉक्टर - अरे, मग मी खाणार नाही असं सांगायचं ना.

पेशंट - अहो, तेच तर केलं मी आणि...

--- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- --- 
पोलिस चौकशीसाठी गंपूच्या घरी येतात आणि दरवाजा ठोठावतात. गंपू - कोण आहे? पोलिस - पोलिस. दरवाजा उघडा...आम्हाला बोलायचंय. गंपू - तुम्ही कितीजण आहात? पोलिस - तीन. गंपू - मग आपासातच बोलून घ्या ना...मी कशाला हवाय?

----------------------------------------------------------------------------------------------
सर - गाढवा, तू वर्गात सतत मुलींशी का बोलत असतोस?

झंप्या - सर, मी गरीब आहे हो. स्मार्टफोन, वॉट्सअॅप मला परवडत नाही ना...म्हणून.