Saturday, March 29, 2014

जालिम बाप -Marathi Jokes

गंपूः माझे बाबा इतके जोरात धावतात इतके जोरात धावतात की त्यांनी बाण मारला तर ते आधी पोहोचतात आणि बाण नंतर पोहोचतो.. 

झंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात इतके जोरात धावतात की त्यांनी बंदुकीतून गोळी मारली तर ते आधी पोहोचतात आणि गोळी नंतर पोहोचते... 

पंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात इतके जोरात धावतात की त्यांचं ऑफिस पाच वाजता सुटतं आणि ते चार वाजताच घरी पोहोचतात! 

------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेयसी : प्रेमाचे चिन्ह म्हणून बदाम आणि त्यातून आरपार गेलेला बाण का दाखवितात 

प्रियकर : जसे रस्त्यावरील सिग्नल्स गाडी चालविणाऱ्याला सावधानतेचा इशारा देतात तसंच प्रेमात पडणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी हा सावधानतेचा इशारा आहे. बाबांनो प्रेमात पडत आहात पण जरा जपून हा बाण टोचतोही आणि हृदय दुखवून जातोही! 

------------------------------------------------------------------------------------------------------
एक आजोबा रस्त्यातून जात असतात. चालताचालता त्यांचं आकाशदर्शन चालू असतं. 

तेवढ्यात ते नेमके ठमाकाकूंच्या वाटेत येतात. त्यांना बघून काकू चिडतात आणि म्हणतात , ' आजोबा जिथे जाताय ना तिथेच बघावं माणसानं नाहीतर जिथे बघताय तिथेच जाल हो! 

------------------------------------------------------------------------------------------------------

मध्यरात्री उशिराने आलेल्या मुलास आई विचारते 

आई : काय रे, कुठं गेला होतास ? 

मुलगा : आई, असं का म्हणतेस, मी इमोशनल चित्रपट पाहिला 'प्यारी माँ' 

आई : अस्सं? ठीक आहे. आत ये, तुझे पप्पा वाट पाहत आहेत. ते तुला 'जालिम बाप' चित्रपट दाखवतील.

------------------------------------------------------------------------------------------------------

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड! 

चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते... 

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे.. 

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!