Friday, March 28, 2014

रिडायल-Marathi Jokes

बायको ः काय हो, आज तुम्ही दुसऱ्या कोणत्यातरी मुलीसोबत सिनेमाला गेला होता. खरं की नाही ते सांगा... 

चतुर नवरा ः काय करणार मी तरी... अगं आजकाल कुटुंबासोबत पाहावा, असा सिनेमा निघतो का तरी? 

---------------------------------------------------------------------------------------------

प्रेयसी : प्रेमाचे चिन्ह म्हणून बदाम आणि त्यातून आरपार गेलेला बाण का दाखवितात 

प्रियकर : जसे रस्त्यावरील सिग्नल्स गाडी चालविणाऱ्याला सावधानतेचा इशारा देतात तसंच प्रेमात पडणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी हा सावधानतेचा इशारा आहे. बाबांनो प्रेमात पडत आहात पण जरा जपून हा बाण टोचतोही आणि हृदय दुखवून जातोही! 

---------------------------------------------------------------------------------------------
झंप्या : मला माझ्या गर्लफ्रेंडला फोन करायचा आहे, तुझा मोबाइल दे ना जरा. 

पंप्या : हा घे, फक्त रिडायल कर. 

---------------------------------------------------------------------------------------------

गंपूः माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांनी बाण मारला तर ते आधी पोहोचतात आणि बाण नंतर पोहोचतो..

झंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांनी बंदुकीतून गोळी मारली तर ते आधी पोहोचतात आणि गोळी नंतर पोहोचते...

पंपूः हे तर काहीच नाही... माझे बाबा इतके जोरात धावतात , इतके जोरात धावतात की , त्यांचं ऑफिस पाच वाजता सुटतं आणि ते चार वाजताच घरी पोहोचतात! 

---------------------------------------------------------------------------------------------

इंजिनिअरिंगचा मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो.) 

मुलगा: आय लव्ह यु.. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू फक्त बोल.. तुझ्यासाठी काही पण... 

मुलगी: बरं मग तू मला सगळे विषय केटीशिवाय सोडवून दाखव. 

मुलगा: येतो ताई... काळजी घे!