गृहस्थ : कार्ड चालेल ना?
वेटर : हो, चालेल की.
गृहस्थ खिशातील व्हिजिटिंग कार्ड काढून वेटरच्या हातात ठेवतो.
वेटर : अहो, हे नाही चालणार.
गृहस्थ : मग, बाहेर कशाला बोर्ड लावलाय, की.. ' ऑल कार्ड्स अॅक्सेप्टेड हिअर ' म्हणून!
-------------------------------------------------------------------------------------
गंपू : मला १५० रुपये द्या. माझ्या परिवाराला भेटायचंय.
साहेब : कुठे आहे तुझं कुटुंब?
गंपू : मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघतंय.
-------------------------------------------------------------------------------------
एक मुलगा रस्त्यावरुन चाललेला असतो. अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो एका गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी - ( हसत) काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा - होय वहिनी! जरा पाय घसरला.
-------------------------------------------------------------------------------------
* रजनीकांत कंपासचा वापर करून सरळ रेषा काढू शकतो.
* रुपयाचे नवीन चिन्ह ही प्रत्यक्षात रजनीकांतची स्वाक्षरी आहे.
* टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहम बेलने पहिल्यांदा फोन वापरला .... तेव्हा त्याच्यावर रजनीकांतचे दोन मिस्ड कॉल्स होते.
* रजनीकांत पाच भाषांमध्ये शिटी वाजवू शकतो.
-------------------------------------------------------------------------------------
प्रश्न - रजनीकांतच्या नाडीचे ठोके कोणत्या एककात मोजतात?
उत्तर - रिश्टर स्केल
उत्तर - रिश्टर स्केल
-------------------------------------------------------------------------------------
जर कुणी आपल्याला पाहून दरवाजा धाडकन बंद केला तर...
आपण पण त्याला दाखवून द्यायचं की दरवाज्याला दोन कड्या असतात.
आपण पण त्याला दाखवून द्यायचं की दरवाज्याला दोन कड्या असतात.
-------------------------------------------------------------------------------------
झंप्या नवीन कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायला जातो. कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी वॉचमनशी बोलून अंदाज घ्यावा म्हणून तो त्याच्याकडे थांबतो.
झंप्या - काय हो, हे कॉलेज चांगलं आहे का?
वॉचमन - येस्स सर...हे एकदम चांगलं कॉलेज आहे.
झंप्या - पण इथून पदवी घेतल्यावर नोकरी मिळते का हो?
वॉचमन - हो तर...मी इथूनच एमबीए केलं आणि बघा, मला याच कॉलेजमध्ये नोकरी मिळाली.