Tuesday, May 20, 2014

फर्स्ट की सेकंड?

एक तरुणी छोट्या मुलाला कडेवर घेऊन रेल्वे तिकिट काढायला जाते. 

तरुणी - एक दादर तिकीट द्या जरा. 

क्लार्क - फर्स्ट की सेकंड? 

तरुणी - ओ, हा माझा नाही. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. 

----------------------------------------------------------------------------------------

प्रोफेसर विसरभोळे ट्रेनने प्रवास करत होते. टीसी आला आणि त्याने त्यांच्याकडे तिकीट ‌मागितलं. प्रोफेसर खिशात, बॅगेत तिकिट शोधू लागले. बराच वेळ गेला तरी त्यांना ते काही सापडेना.

टीसी - राहू द्या...नका शोधू. मला माहितीय तुम्ही तिकिट काढले असणारच.

विसरभोळे - ते ठिक आहे हो...पण उतरायचं कुठे हे मला तरी कसं कळणार आता?


--------------------------------------------------------------------------------------------------
बायको - तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? 

नवरा - खूप. 

बायको - मग मी मेले तर काय होईल? 

नवरा - मी ठार वेडा होईन. 

बायको - पण तुम्ही दुसरं लग्न करणार की नाही? 

नवरा - अगं, वेड्या माणसाचं काही सांगता येतं का?