Saturday, May 24, 2014

'तुम मेरी जान हो.'


भिकारी - ओ बाबा, १ रुपया द्या...तीन दिवस जेवलेलो नाही. 

गंपू - अरे, तीन दिवस काही खाल्लं नाहीयस. मग १ रुपयाने काय होणार? 

भिकारी - वजन किती कमी झालंय ते तरी बघतो. 

------------------------------------------------------------

बंता स्वतःशीच हसत म्हणाला,' कसं फसवलं बूट विकणाऱ्याला..एकाच बुटाच्या किमतीत दोन बूट खरेदी केली. त्याने एकाच बुटावर किमतीचे लेबल लावले होते. दुसऱ्यावर तो लावायला विसरला, त्यात माझी काय चूक?'


------------------------------------------------------------
रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीला पाहून रोडरोमिओने डायलॉग मारला. 'तुम मेरी जान हो.'

मुलीने हसून लगेच उत्तर दिले, 'और तुम मेरे भाईजान हो.'