एकदा बास्केटबॉलचा एक खेळाडू रजनीकांतला म्हणतो , ' मी बास्केटबॉल हाताच्या एका बोटावर दोन तास गोल फिरवू शकतो. तुला येतं का ?'
रजनीकांत : यन्ना रास्कला , माइंड इट. तुला काय वाटतं , ही पृथ्वी काय मनाने गोलगोल फिरते ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------
एका प्यूनचा ऑफिसात पहिला दिवस असतो. त्यादिवशी मालक ऑफिसात येतात. मालक त्या नवीन प्यूनला बोलावून घेतात आणि विचारतात , ' तुम्हाला मॅनेजरने काम काय करायचे ते समजावून सांगितले का ?'
प्यून : हो. ते म्हणाले , मी जरा डुलकी घेतो. साहेब आले की मला उठव!