Sunday, December 21, 2014

हो वहिनी , आलेला ना इथे तो

गंपू घरी उशीरा आला. उशीर का झाला असं बायकोने विचारल्यावर गंपूने सांगितलं अगं मित्राकडे गेलो होतो गं! '. 

बायकोने त्याचं म्हणणं तपासण्यासाठी गंपूच्या दहा मित्रांना फोन लावला. 

त्यापैकी पाचजणांनी उत्तर दिलं , ' हो वहिनी आलेला ना इथे तो 

तिघांनी सांगितलं , ' आला होता...हा काय आत्ताच गेला. 

तर उरलेले दोघे म्हणाले , ' अहो वहिनी हा काय इथेच बसला आहे! देऊ का त्याच्याकडे फोन ?' 
--------------------------------------------------------------------------------------------
आर जे वटवटसम्राट शोमध्ये चिंटूचा फोन येतो. 

चिंटू- मला श्याम कर्णिक नावाच्या माणसाचं पाकीट मिळालंय. त्यात १५००० रुपये आहेत. 

आर जे शाब्बास मित्रा तुझ्या प्रामाणिकपणाला दाद द्यावीशी वाटते. तुला आता हे पाकीट परत द्यायचंय ना

चिंटू चल रे वेड्या मी फक्त हे सांगायला फोन केला की श्यामसाठी एक सॅड साँग लाव...