Saturday, December 20, 2014

अरे देवा , तू पुन्हा आलास ?'

एक कैदी (दुस-याला) : एकसारखे दिसणारे चेहरे कधी दगा देतील हे सांगता येत नाही बघ. एकदा एक जण मला अमिताभ बच्चन समजला. 

दुसरा कैदी : अरे हो ना मला पण एकदा एकजण राहुल गांधी समजला. 

हे संभाषण ऐकत असलेला तिसरा कैदी म्हणाला ,' अरे हे तर काहीच नाही. मी जेव्हा या जेलमध्ये तिसऱ्यांदा आलो ना तेव्हा जेलर म्हणाला...अरे देवा तू पुन्हा आलास ?' 

------------------------------------------------------------------------------------
एक आजारी पती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतो. औषधाच्या जास्त मात्रेमुळे त्याला गाढ झोप लागते. अचानक झोपेतून जागा होऊन तो म्हणतो , ' मी कुठे आहे स्वर्गात तर नाही ना ?' 
तेवढ्यात बाजूला बसलेली त्याची बायको म्हणते , ' नाही हो. मी अजून आहे तुमच्याबरोबर. '