Showing posts with label मराठी विनोद. Show all posts
Showing posts with label मराठी विनोद. Show all posts

Thursday, January 22, 2015


मुलगा : मला प्लीज १५० रु. द्या.. मला माझ्या कुटुंबाला भेटायचंय! 

ठमाकाकू : कुठे आहे तुझं कुटुंब? 

मुलगा : मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघताहेत! 
----------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षक : मी लेक्चर सुरू केलं, की तू नेहमी शेजा-याशी गप्पा मारायला सुरुवात करतोस...

गंपू : नाही सर, मला झोपेत बोलण्याची सवय नाही!! 

Wednesday, January 21, 2015


शिक्षक : तुझं व्याकरण कच्चं आहे... म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं... पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस. 

गंपू : माझं गणितही कच्चं आहे!!

---------------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : बायको ही सर्वात मोठी जादूगार असते. 

झंपू : का? 

गंपू : कारण ती कोणत्याही गोष्टीचं रूपांतर सफाईदारपणे भांडणात करू शकते! 


Tuesday, January 20, 2015


दोन बायका आपापासात भांडत असतात. 

त्यातली एक तावातावाने म्हणते, 'थांब जरा, मी तुला नंतर बघते.' 

दुसरी म्हणते, ' का, नंतर कशासाठी? आत्ता का नाही?' 

पहिली म्हणते, 'कारण मी माझा चष्मा घरी विसरले आहे.' 

------------------------------------------------------------------------------------------
पहिल्यांदाच मुंबईला आलेला गंपू डबल-डेकर बस बघून अचंबित होतो. 

गंपू : अरेच्चा! मुंबईला श्रीमंत शहर म्हणतात. पण ड्रायव्हरचा पगार वाचवण्यासाठी बसवर बस ठेवून चालवतात. 

Monday, January 19, 2015


गंपू लंडनला जातो. तिथल्या एका हॉटेलमध्ये जातो. 
त्याला कोंबडी खायची इच्छा होते, पण कोंबडीला इंग्रजीत काय म्हणतात, तेच त्याला आठवत नाही. 
म्हणून तो म्हणतो, 'एग्ज मदर!' 
-------------------------------------------------------------------------------------------
गंपू : अहो, एखादा लेडिज ड्रेस दाखवा. 

दुकानदार : हो साहेब...दाखवतो ना. पण आधी हे सांगा की बायकोसाठी घ्यायचाय की मग एखादा महागातला दाखवू? 

Sunday, January 18, 2015



कंजुष : उकडत असेल तर मी खिडक्या उघड्या ठेवतो, पण पंखा लावत नाही... 

गंपू : तरीही उकडत असेल तर? 

कंजुष : तर मात्र मी पंख्यासमोर बसतो... 

कंजुष : मग पंखा सुरू करतो!!! 
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आई : बाळा, तू हात धुतलेस, तर एक लाडू देईन... आणि पाय धुतलेस तर दोन लाडू देईन!! 

गंपू : आई, तू डबाच खाली काढून ठेव, मी आंघोळ करून येतो!!! 

Saturday, January 17, 2015


डॉक्टर : अभिनंदन! तुमच्या घरी कन्यारत्न जन्माला आलंय!! 

गंपू : धन्यवाद! धन्यवाद! पण कमाल आहे हो टेक्नॉलॉजीची... बायको इथे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, पण कन्यारत्न घरी जन्माला आलंय!! 
---------------------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : डॉक्टर, माझा जीव वाचवा... माझा जीव वाचवा... 

डॉक्टर : शांत व्हा... काय झालंय तुम्हाला? 

गंपू : अहो, मी मोबाइलमध्ये लाइफटाइम रिचार्ज कूपन घातलेलं... त्याचा टॉकटाइम संपलाय आज!!! 

Thursday, January 15, 2015


गंपूच्या घरी चोर येतो आणि गंपूला बघून पळून जायला लागतो. 

गंपू त्याच्या मागे पळायला लागतो आणि अचानक त्याच्या पुढे निघून जातो. जाताना म्हणतो, 'एक तर माझ्या घरी चोरी करतोस आणि वर माझ्याशीच रेस लावतोस?' 
-----------------------------------------------------------------------------------------------
बॉयफेंड : डार्लिंग माझ्यासाठी असं काही बोल की ज्याने मला एकाचवेळी आनंद आणि दु:ख दोन्ही होईल. 

गर्लफेंड : आय लव्ह यू, दादा!! 

Wednesday, January 14, 2015


एकदा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फिरायला जातात. मुलाला ठेच लागते आणि त्याच्या पायातून रक्त वाहू लागतं. मुलाला वाटतं की ती आता ओढणी फाडून त्या जखमेवर बांधेल. तो आशेनं तिच्याकडे बघू लागतो. 

..... 

गर्लफ्रेंड : ए...बघू पण नकोस. हा दिवाळीला घेतलेला ड्रेस आहे माझा. 

------------------------------------------------------------------------------------------------
गंपू नोकरीचा अर्ज भरत असतो. नाव, पत्ता वय लिहिल्यानंतर खाली प्रश्न असतो- 

पगाराची अपेक्षा?' 

या प्रश्नाला उत्तर काय लिहावे यामुळे संभ्रमात पडलेला गंपू लिहितो 'आहे!' 

Tuesday, January 13, 2015


गंपू : हल्ली माझे केस खूप गळताहेत.. 

झंपू : कशाने? 

गंपू : चिंतेमुळे. 

झंपू : कसल्या चिंतेमुळे? 

झंपू : केस गळण्याच्या चिंतेमुळे! 
------------------------------------------------------------------------------------------------------------
पिंकी : एक लीटर गायीचं दूध द्या. 

दूधवाला : बाळा, तुझं पातेलं खूप लहान आहे... 

पिंकी : बरं, मग एक लीटर बकरीचं दूध द्या!! 

Monday, January 12, 2015



गंपूच्या घरी त्याच्या सासूबाई येतात. 

पत्नी : जा ना, आईसाठी काही तरी घेऊन ये! 

गंपू : टॅक्सी चालेल? 
-----------------------------------------------------------------------------------------------
गर्लफ्रेंड : तुझा पूर्ण विश्वास आहे ना की, तू फक्त माझ्यावर प्रेम करतोयस? 

बॉयफ्रेंड : हो गं, मी माझी पूर्ण यादी पुन्हा चेक केलीय. 

Sunday, January 11, 2015


निवडणुकीत नव्याने निवडून आलेले गणपतराव, ग्रामीण जीवन आपल्याला कसं आवडतं हे दाखवण्यासाठी बैलगाडीच्या बाजूला उभे राहिले. बैलाच्या अंगावर हात ठेवून मस्त पोज देत त्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतला. दुस या दिवशी तो फोटो पेपरमध्ये छापून आला. फोटोखाली कॅप्शन होती 

------------------------------------------------------------------------------------------------
गंपू : अहो दुकानदार, ही रिसिट बघा. पाच वर्षांपूवीर् मी माझे फाटलेले बूट तुमच्याकडे शिवायला 

दिले होते. मी ते विसरूनच गेलो होतो. 

दुकानदार : नो प्रॉब्लेम. मी शोधून काढतो. 

थोड्या वेळाने दुकानदार धुळीने माखलेला एक बॉक्स घेऊन येतो. 

गंपू : अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीय की तुम्ही एवढ्या आठवणीने माझे बूट ठेवले 

असतील. 

दुकानदार : इट्स ओके. ग्राहकांचं समाधान हेच तर आमचं उद्दीष्ट आहे. असो, आता ८ दिवसांनी बूट 

न्यायला या. अजून त्याची शिलाई बाकी आहे. 

Saturday, January 10, 2015


चिंट्या आमिर खानचा कट्टर फॅन होता. त्यामुळेच 'ढगाळ वातावरणामुळे पीके धोक्यात' ही बातमी वाचून चिंट्या अत्यंत घाबरला आणि त्याने आमिरच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना सुरु केली.
--------------------------------------------------------------------------------
मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राऊंड घेत होते. एक वेडा छतावर जाऊन उलटा लटकत होता. 

डॉक्टर - काय रे, असा का लटकतोयस? 

वेडा - मी बल्ब आहे. 

डॉक्टर - अरे, मग जळतोयस कुठं? 

वेडा - ओ, लाइट्स गेलेत ना.

Friday, January 9, 2015



बंड्या : डॉक्टर, मला रात्री झोपच येत नाही.

डॉक्टर : झोपताना एक, दोन, तीन... असे आकडे मोजत जा. दुसऱ्या दिवशी)

बंड्या : काही उपयोग नाही. काल तीन लाख ३३ हजार, ३३३ पर्यंत आलो आणि सकाळच झाली.
------------------------------------------------------------------------------------------------------------

एका कंजूष माणसाला विजेचा धक्का बसतो. 

बायको घाबरून विचारते, कसा आहेस? 

कंजूष : मी बरा आहे गं... पण विजेचे युनिट किती वाढले ते बघ!!!

Thursday, January 8, 2015


निवडणुकीत नव्याने निवडून आलेले गणपतराव, ग्रामीण जीवन आपल्याला कसं आवडतं हे दाखवण्यासाठी बैलगाडीच्या बाजूला उभे राहिले. बैलाच्या अंगावर हात ठेवून मस्त पोज देत त्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतला. दुस या दिवशी तो फोटो पेपरमध्ये छापून आला. फोटोखाली कॅप्शन होती 

श्री. गणपतराव डावीकडून तिसरे'. 
------------------------------------------------------------------------------------------------
गंगूबाई : माझ्या मुलाची वागणूक खूपच चांगली आहे... 

झंपू : त्याला तर पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालीये... 

गंगूबाई : पण चांगल्या वागणुकीमुळे त्याची दोन वर्षांनतरच सुटका झालीये!!

Tuesday, January 6, 2015


बायको - शी, हा कम्प्युटर मी दिलेल्या कमांडसप्रमाणे कामच करत नाहीय. 

नवरा - अगं डार्लिंग, तो कम्प्युटर आहे, तुझा नवरा नाही
-------------------------------------------------------------------------------------------

रस्त्यावर चालणाऱ्या अंध व्यक्तिला आणि व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणाऱ्या व्यक्तिला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा. 

-------------------------------------------------------------------------------------------

Monday, January 5, 2015


प्पू : माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

पिंकी : फुर्रर्रर्र

पिंकी : मी तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकतो.

पिंकी : फुर्रर्रर्र

पप्पू : मी तुझ्यासाठी हिऱ्याची अंगठीही आणू शकतो.

पिंकी : अय्या, खरंच ?

पप्पू : फुर्रर्रर्र
-------------------------------------------------------------------------------------
इंजिनीअरिंगला असलेला एक मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो.

मुलगा : आय लव्ह यू. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू फक्त बोल...तुझ्यासाठी काय करू?

मुलगी : हो का? मग तुझे सगळे विषय एकाही केटीशिवाय मला सोडवून दाखव.

मुलगा : अरे बापरे, येतो मी ताई...बाय.

Sunday, January 4, 2015


आठवीचा वर्ग सुरू असतो. 

मॅडम - मॅडम, साप आधी का कात आधी? 

झंप्या - कात आधी. 

मॅडम - कसं काय? 

झंप्या - आधा है चंद्रमा, रात आधी. रह ना जाए तेरी मेरी बात आधी... मुला'कात' आधी.. 
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर - व्हाय आर यू लेट?
गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला....
सर - टॉक इन इंग्लिश!
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपशिंग्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अॅम लंगडं!!

Saturday, January 3, 2015


बॉयफ्रेंड - काय गं, काल कितीवेळा फोन केले तुला? उचलला का नाहीस? 

गर्लफ्रेंड - अरे, मी रिंगटोनवर नाचत होते. 

------------------------------------------------------------------------------------------
नवरा - मला लॉटरी लागली तर काय करशील? 

बायको - काही नाही...लॉटरीचे अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन. 

नवरा - मग हे घे ५० रुपये, मला १०० रुपयांची लॉटरी लागलीय. 

Friday, January 2, 2015


आजोबा - बंड्या, लवकर लपून बस. ८ दिवस शाळेत गेला नाहीस म्हणून तुझे सर आले आहेत तुला शोधायला. 

बंड्या - आजोबा, तुम्हीच लपून बसा. मी शाळेत सांगितलंय आजोबा वारले म्हणून. 
--------------------------------------------------------------------------------------------------
नवरा-बायको एकत्र जात असतात. तितक्यात समोरुन येणारी एक तरुणी नवऱ्याला 'हाय' करून निघून जाते. 

बायको - काय हो, कोण होती ती मुलगी? 

नवरा - आता तू प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. अजून तिलाही सांगायचंय तू कोण आहेस ते. 

Thursday, January 1, 2015


झंपू - कामावर असताना एकसारखं शिट्ट्या कोण मारतं? 

गंपू - अं...मला नाही माहीत. 

झंपू - सोप्पंय, ट्रॅफिक पोलिस! 

---------------------------------------------------------------------------------------
भिकारी - साहेब २० रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे. 

गंपू - काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो. 

भिकारी - साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना. 

गंपू - अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय. 

भिकारी - नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय.